female prostitution
मंगळवार, १० जुलै, २०१२
मंगळवार, २९ मार्च, २०११
वेश्यागृहे चालविण्यासाठी मुलींचे व स्त्रियांचे पुरवठ्याचे मार्ग
१. त्यांच्या वेश्या गृहात जन्मास आलेल्या मुली.
२. रस्त्यावर व अन्य सार्वजनिक ठिकाणी भिक मागत फिरणाऱ्या मुलीना आमिष दाखवून गृहात आणणे.
३. यात्रा, रेल्वे, बस अशा ठिकाणी चुकलेल्या मुलीना पाळणे.
४. यात्रा, प्रवास व रस्त्यावरून मुलीना फूस लावून व जबरदस्तीने पळवून नेणे.
५. दुसय्राने पळविलेल्या मुली विकत घेणे.
६. योग्य मुलींवर गुंदेगिरी करून व बलात्कार करून त्यांना समाजातून उठविणे व हळू हळू स्वतःच्या कचाट्यात त्यांना पकडणे.
७. काही कारणाने घरातून पळून जाणाय्रा, सावत्र आई व बाप, दुष्ट नवरा, यांच्या जाचाला कंटाळलेल्या किवा फाजील धाडसी व मूर्ख मुलीना खोटी प्रलोभने दाखवून इच्छेने व अनिचेने पळविणे.
शुक्रवार, २५ मार्च, २०११
बालवेश्या आणि वेश्यांच्या अल्पवयीन मुली
अ] बालवेश्या:
बालवेश्या ह्या १६ वर्षांच्या आतील असतात. ह्या व्यवसायात बाल्वेश्याना प्रचंड मागणी असते कारण जेवढी कोवळी मुलगी तेवढी मजा जास्त अशी भावना वास्नाधीन लोकांची असते. तसेच ह्या मुलींपासून एडस सारखा महाभयंकर रोग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात नसते. ह्या कारणास्तव आज संपर्ण जगात बाल्वेश्यांना प्रचंड मागणी आहे. ब] वेश्यांच्या अल्पवयीन मुली:
ज्या वेळेस वेश्या ह्या मुलीना जन्म देतात त्यावेळेस त्यांना स्वतःला,दलाल, कोठेवले व घरवाले ह्यांना अतिशय आनंद होतो. कारण त्यांना वाटते कि मुलगी मोत्जी झाल्यावर आमदनी मिळेल तसेच म्हातारपणात आधार मिळेल अशा कारणामुळे वेश्यांना मुलगी झाल्यावर आनंद होतो. अनेक वेश्यांवर कर्ज असते व त्या प्रचंड व्याजही भरत असतात. हे कर्ज फेडण्याची नसते त्यांचीी नसते व तसेच आर्थिक परिस्थिती हि दुर्बल असल्यामुळे ह्या वेश्या आपली मुलगी मोठी झाल्यावर ह्याच व्यवसायात आणतात. ह्यामुली वयाने लहान असल्यामुळे त्यांना वस्तुस्थितीचे गांभीर्य वा ज्ञान नसल्यामुळे ते ग्राहकांच्या प्रेमात पडतात अशा मुळे त्या गर्भवती होतात. काही वेश्या ह्या आपल्या मुलींना ह्या वातावरणापासून दूर ठेवतात व आपल्या रोजगारातून त्यांना पेसे पाठवितात, तसेच त्या मुलींचे लग्नही लावून देतात.
परंतु जेव्हा त्या पतीला सत्य वस्तुस्थितीची माहिती होते तेव्हा तो त्या मुलीला मारतो व त्रास देतो हे वस्तुचित्र दिसून येते. देव्दासिच्या मुली ह्या परंपरेनुसार देवदासी बनतात. त्यांची आर्थिक परिस्थितीही अतिशय हलाखीची असते. त्यांची परिस्थिती हलाखीची त्या ह्या व्यवसायाकडे वळतात. आई होणे हा स्त्रीच्या जीवनातील सर्वात मोठा आनद असतो म्हणून वेश्या स्त्रियांनाही मुल व्हावे असे वाटते.तसेच म्हातारपणात मुळे आपला सांभाळ करतील म्हणून त्यांना मुल हवे असते.
गुरुवार, २४ मार्च, २०११
वेश्या व्यवसायाचे परिणाम
1. ह्या व्यवसायामुळे स्त्री जातीचा व पर्यायाने संपूर्ण मानव जातीचीच अधोगती होत आहे.
२. हा व्यवसाय चालविण्यासाठी अब्रू घालवून आज अनेक मुली या नरकात येत आहेत.
३. अनेतिक व अयोग्य मार्गाने गरजा पूर्ण करता येत असल्याने विवाह संस्थेचे पावित्र्य व उदात्तता ह्यांनाच धोका उत्पन्न होतो.
४.बाहेरचा नाद लागल्याने अनेक सुखी कुटुंबे धुळीस मिळाली आहे.
५.समाजाच्या नीती मूल्यांना जबरदस्त हादरा बसला असून समाजात अशा तर्हेने स्वैराचार सुरु झाल्यास मानव जातीला आताच त्याचे भयंकर मोल देण्याची वेळ येऊन ठेपते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
६. वेश्या व्यवसायामुळेच व वासनाधीन आंबट शोकीनान्मुळेच अश्लील चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर विशेषतः तरुण वर्गावर होऊन ते दिशाहीन होत आहे.
७. ह्या व्यवसायामुळे नेतिकतेचा ह्रास होत आहे.
८. एडस, गुप्त रोग आदि चा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत आहे.
९. बालवेश्यांच्या प्रचंड मागणीमुळे मुलीना पळवून नेणे, फसवणे, आमिष दाखवून ह्या व्यवसायात आणण्याचे प्रकार वाढत असल्याने सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे.
१०.गुप्त रोग, एडस सारख्या रोगाचा फेलाव होऊन अनेक निरापराध व नवीन जन्मास येणार्या बालकांना सुधा ह्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहे.
अशा तर्हेने ह्या व्यवसायाचे दुष्परिणाम लक्षात घेवूनही काही लोक या व्यवसायात उपयोगिता आहे असे म्हणतात. त्यांच्या मते, हा व्यवसाय समाजात असल्याने अनेक व्यक्तींची गरज भागवली जाते,तसे झाले नसते तर समाजातील सर्व साधारण स्त्रियांना या लोकांचा उपद्रव झाला असता.या मुद्द्यातील काही भाग एकवेळ मान्य करूनही या व्यवसायासाठी ज्या तर्हेने स्त्रिया मिळविल्या जातात ते मार्ग केव्हाही इष्ट नाही हे नजरेआड करून चालणार नाही असे वाटते.
बुधवार, २३ मार्च, २०११
भद्रकाली(सफेद लेन) विभागाची माहिती
नाशिक शहर हे अतिप्राचीन शहर असून हे धार्मिक तीर्थ क्षेत्र व पावन भूमी म्हणून हि समजले जाते. नाशिक शहराचे मध्यवर्ती व विकसित व्यापार केंद्र म्हणून भद्रकाली हा भाग ओळखला जातो. भद्रकाली भागाजवळ मेनरोड, शालीमार, रविवार पेठ आदि. विकसित भाग भद्रकालीच्या आजूबाजूला आहे. भद्रकाली हे नाव भद्रकाली देवीच्या नावामुळे पडले आहे. शहरातील प्रतिष्ठा व गर्दीचे ठिकाण असल्यामुळे भद्रकाली येथील सफेद लेन मध्ये वेश्या व्यवसाय सर्रास सुरु आहेत. नाशिक शहरातील वेश्या व्यवसायाचा विचार करता हा व्यवसाय विशिष्ट ठिकाणी चालतो. ह्यात भद्रकाली, गंजमाळ, फुले नगर, वूनय नगर तसेच काही हॉटेल्स मध्येहि वेश्या व्यवसाय चालतो असे समजते. त्याच प्रमाणे रस्त्यावर अथवा गर्दीच्या ठिकाणी चालणाय्रा वेश्या व्यवसायात भद्रकाली, मेनरोड, फुले नगर व मार्केट यार्ड आदि ठिकाणी व्यवसाय सर्रास चालतो. नाशिक शहरामध्ये वेश्या व्यवसाय करणारे प्रमुख ठिकाण म्हणून भद्रकाली येथे चालणारा व्यवसाय होय.
भद्रकाली येथील सफेद लेन मध्ये हा व्यवसाय चालतो. हा भाग अतिशय गलिच्छ असून आरोग्य विषयक सोई -सुविधा हि अपुर्या आहेत, येथील वेश्यांची संख्या ६० ते ८० च्या वर असून ह्या व्यतिरिक्त अनेक स्त्रिया ह्या दररोज येऊन जाऊन करतात असे वस्तुचित्र आहे. भद्रकाली येथे अनेक वेश्या ह्या २० वर्षांच्या आतील आहे तर काही बाल वेश्याही आहेत.ह्यास शांताबाईचा अड्डा असेही म्हणतात.भद्रकाली भागात दलाली पद्धतही आहे तसेच अनुभवी वेश्या ह्या व्यवस्थापनेचे कार्य करतात. एकंदर भद्रकाली भागात गुन्हेगारीही फार मोठ्या प्रमाणात आहे. वेश्यांची मुले हि बालगुन्हेगारी कडे लवकर वळतात हि वस्तुस्थिती दिसून येते. घाणेरडे , अपुय्रा सोयीसुविधा, व गुन्हेगारी युक्त असे अयोग्य वातावरण ह्या भद्रकाली सफेद लेनचे आहे.
सोमवार, १४ मार्च, २०११
वेश्यांचे व्यवसायाचे प्रकार
१. स्त्रिया हा व्यवसाय वंश परंपरेने करायचा ठरवितात. तिने वंश परंपरागत चालू असलेला हा धंदा करायचा नाही ठरविले तरी समाज तिला दुसरा धंदा करून सन्मानाने जगणे अशक्य करतो.
२. कारखान्यात किवा इतर ठिकाणी नोकरी करणाय्रा स्त्रिया या नोकरी व्यतिरिक्त उरलेल्या वेळात दुयम धंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारतात.
३.नाचणे, गाणे, तत्सम खेळ करणे व सोयीनुसार वेश्या व्यवसाय करणे हा आणखी एक वेश्या व्यवसायाचा प्रकार आहे.
४. परिस्थितीने लाचार होऊन कठीण काळातून पार पडण्यापुरता वेश्या व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या स्त्रियांचा आणखी एक वर्ग आहे, पण त्यांना धंदेवाईक वेश्या म्हणता येणार नाही.
५. अंगवस्त्र व ठेवलेली स्त्री हा वेश्या व्यवसायातील स्त्रियांचा एक प्रकार आहे.
६. ह्या व्यतिरिक्त देवदासी, कॉलगर्ल्स आदि he वेश्या व्यवसायाचे आणखी काही प्रकार आहेत.
७. प्रकट समूहात ज्या वेश्या असतात त्या शक्यतो परवानाधारक असतात. त्यांची शारीरिक तपासणीही नेहमी केली जाते.
८. गुप्त समूह प्रकारामध्ये या वेश्या विनापरवाना धारक असून हा व्यवसाय लपून छपून व चोरीने करतात.
२. कारखान्यात किवा इतर ठिकाणी नोकरी करणाय्रा स्त्रिया या नोकरी व्यतिरिक्त उरलेल्या वेळात दुयम धंदा म्हणून हा व्यवसाय स्वीकारतात.
३.नाचणे, गाणे, तत्सम खेळ करणे व सोयीनुसार वेश्या व्यवसाय करणे हा आणखी एक वेश्या व्यवसायाचा प्रकार आहे.
४. परिस्थितीने लाचार होऊन कठीण काळातून पार पडण्यापुरता वेश्या व्यवसायाचा स्वीकार करणाऱ्या स्त्रियांचा आणखी एक वर्ग आहे, पण त्यांना धंदेवाईक वेश्या म्हणता येणार नाही.
५. अंगवस्त्र व ठेवलेली स्त्री हा वेश्या व्यवसायातील स्त्रियांचा एक प्रकार आहे.
६. ह्या व्यतिरिक्त देवदासी, कॉलगर्ल्स आदि he वेश्या व्यवसायाचे आणखी काही प्रकार आहेत.
७. प्रकट समूहात ज्या वेश्या असतात त्या शक्यतो परवानाधारक असतात. त्यांची शारीरिक तपासणीही नेहमी केली जाते.
८. गुप्त समूह प्रकारामध्ये या वेश्या विनापरवाना धारक असून हा व्यवसाय लपून छपून व चोरीने करतात.
रविवार, १३ मार्च, २०११
वेश्या व्यवसायाची कारणे..............
वेश्या व्यवसाय अस्तित्वात येण्यास अनेक कारणे आहे. हा प्रश्न समाज जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित असून त्या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणजे हा व्यवसाय होय. म्हणून ह्या व्यवसायाच्या मुळाशी धार्मिक, सामाजिक, आर्थिक व मानवशास्त्रीय कारणे आहेत. डेव्हिस [समाजशास्त्रज्ञ] यांच्या मते ह्या व्यवसायाच्या मुळाशी पुरुषांची प्रभ्त्वाची व स्त्रियांची गौणत्वाची भावना कारणीभूत असते. त्यामुळे पुरुषांच्या व स्त्रियांच्या या व्यवहाराला सामाजिक संमती मिळते. स्त्रियांना ह्या व्यवसायाला उद्युक्त होण्यास मुख्यता निरक्षरता, अज्ञान व दारिद्र्य हि कारणीभूत आहेत. पण त्या शिवाय काही आळशी लोक स्वतःचा अयोग्य मार्गाने घेण्यासाठी स्त्रियांना हा व्यवसाय करण्यास भाग पडतात.
समाजात आर्थिक परस्थिती बिकट असेल, वेहवाहिक जीवन असंतुष्ट असेल, जर शारीरिक शोषण वा कसले दडपण असेल तर स्त्रिया ह्या मार्ग कडे वळतात. आपल्या देवाला सांड वा बोकडच वाहण्याची प्रथा असती तर त्यात देव कदाचित भक्तांच्या दृष्टीने असंतुष्ट राहिला असता, तेव्हा देवाला संतुष्ट करण्यासाठी मुलीना देवाला वाहण्याचा प्रघात आपल्याकडे बर्याच भागात आढळून येतो, अशा स्त्रियांना देवदासी, मुरळी,वारांगना, बसवीस,इ. नावाने संबोधले जाते.पती फार दिवस आजारी असणे,लांब असणे, पत्नीकडे पतीने दुर्लक्ष कारणे,दुर्बल असणे, इ. अनेक कारणांनी नेतिक भान नसलेल्या स्त्रिया एकाएकी ह्या मार्गाला वळतात. चांगल्या व्यक्तीशी लग्न करून सुखाचा संसार थाटण्याची त्यांची इच्छा स्वप्नवतच ठरण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे अखेरीस नाईलाजाने ते आपला परंपरागत व्यवसाय पुढे चालूच ठेवतात.
अशा रीतीने सामान्यतः पेसा, रूढी, व परिस्थिती ह्या तीन बाबी प्रामुख्याने स्त्रियांना ह्या व्यवसायात येण्याला कारणीभूत झाल्याचे दिसून येते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)