वेश्या व्यवसाय अस्तित्वात येण्यास अनेक कारणे आहे. हा प्रश्न समाज जीवनाच्या सर्व अंगाशी संबंधित असून त्या सर्वांचा एकत्रीत परिणाम म्हणजे हा व्यवसाय होय. म्हणून ह्या व्यवसायाच्या मुळाशी धार्मिक, सामाजिक, आर्थिक व मानवशास्त्रीय कारणे आहेत. डेव्हिस [समाजशास्त्रज्ञ] यांच्या मते ह्या व्यवसायाच्या मुळाशी पुरुषांची प्रभ्त्वाची व स्त्रियांची गौणत्वाची भावना कारणीभूत असते. त्यामुळे पुरुषांच्या व स्त्रियांच्या या व्यवहाराला सामाजिक संमती मिळते. स्त्रियांना ह्या व्यवसायाला उद्युक्त होण्यास मुख्यता निरक्षरता, अज्ञान व दारिद्र्य हि कारणीभूत आहेत. पण त्या शिवाय काही आळशी लोक स्वतःचा अयोग्य मार्गाने घेण्यासाठी स्त्रियांना हा व्यवसाय करण्यास भाग पडतात.
समाजात आर्थिक परस्थिती बिकट असेल, वेहवाहिक जीवन असंतुष्ट असेल, जर शारीरिक शोषण वा कसले दडपण असेल तर स्त्रिया ह्या मार्ग कडे वळतात. आपल्या देवाला सांड वा बोकडच वाहण्याची प्रथा असती तर त्यात देव कदाचित भक्तांच्या दृष्टीने असंतुष्ट राहिला असता, तेव्हा देवाला संतुष्ट करण्यासाठी मुलीना देवाला वाहण्याचा प्रघात आपल्याकडे बर्याच भागात आढळून येतो, अशा स्त्रियांना देवदासी, मुरळी,वारांगना, बसवीस,इ. नावाने संबोधले जाते.पती फार दिवस आजारी असणे,लांब असणे, पत्नीकडे पतीने दुर्लक्ष कारणे,दुर्बल असणे, इ. अनेक कारणांनी नेतिक भान नसलेल्या स्त्रिया एकाएकी ह्या मार्गाला वळतात. चांगल्या व्यक्तीशी लग्न करून सुखाचा संसार थाटण्याची त्यांची इच्छा स्वप्नवतच ठरण्याची शक्यता अधिक असते.त्यामुळे अखेरीस नाईलाजाने ते आपला परंपरागत व्यवसाय पुढे चालूच ठेवतात.
अशा रीतीने सामान्यतः पेसा, रूढी, व परिस्थिती ह्या तीन बाबी प्रामुख्याने स्त्रियांना ह्या व्यवसायात येण्याला कारणीभूत झाल्याचे दिसून येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा