बुधवार, २३ मार्च, २०११

भद्रकाली(सफेद लेन) विभागाची माहिती

नाशिक शहर हे अतिप्राचीन  शहर असून हे धार्मिक तीर्थ क्षेत्र व पावन भूमी म्हणून हि समजले जाते. नाशिक शहराचे मध्यवर्ती व विकसित व्यापार केंद्र  म्हणून भद्रकाली हा भाग ओळखला जातो.  भद्रकाली भागाजवळ मेनरोड, शालीमार, रविवार पेठ आदि. विकसित भाग भद्रकालीच्या आजूबाजूला आहे. भद्रकाली हे नाव  भद्रकाली देवीच्या नावामुळे पडले आहे. शहरातील प्रतिष्ठा व गर्दीचे ठिकाण असल्यामुळे  भद्रकाली येथील सफेद लेन मध्ये वेश्या व्यवसाय सर्रास सुरु आहेत. नाशिक  शहरातील वेश्या व्यवसायाचा विचार करता हा व्यवसाय विशिष्ट ठिकाणी चालतो. ह्यात भद्रकाली, गंजमाळ, फुले नगर, वूनय नगर तसेच काही हॉटेल्स मध्येहि वेश्या व्यवसाय चालतो असे समजते.  त्याच प्रमाणे रस्त्यावर अथवा गर्दीच्या ठिकाणी चालणाय्रा वेश्या व्यवसायात भद्रकाली, मेनरोड, फुले नगर व मार्केट यार्ड आदि ठिकाणी व्यवसाय सर्रास चालतो.  नाशिक शहरामध्ये वेश्या व्यवसाय करणारे प्रमुख ठिकाण म्हणून भद्रकाली येथे चालणारा व्यवसाय होय.
        भद्रकाली येथील सफेद लेन मध्ये हा व्यवसाय चालतो. हा भाग अतिशय गलिच्छ असून आरोग्य विषयक सोई -सुविधा हि अपुर्या आहेत, येथील वेश्यांची संख्या ६० ते ८० च्या वर असून ह्या व्यतिरिक्त अनेक स्त्रिया ह्या दररोज येऊन जाऊन करतात असे वस्तुचित्र आहे.  भद्रकाली येथे अनेक वेश्या ह्या २० वर्षांच्या आतील आहे तर काही बाल वेश्याही आहेत.ह्यास शांताबाईचा अड्डा असेही म्हणतात.भद्रकाली भागात दलाली पद्धतही आहे तसेच अनुभवी वेश्या ह्या व्यवस्थापनेचे कार्य  करतात.  एकंदर भद्रकाली भागात गुन्हेगारीही फार मोठ्या प्रमाणात आहे.  वेश्यांची मुले हि बालगुन्हेगारी कडे लवकर वळतात हि वस्तुस्थिती दिसून येते. घाणेरडे , अपुय्रा सोयीसुविधा, व गुन्हेगारी युक्त असे अयोग्य वातावरण ह्या  भद्रकाली सफेद लेनचे आहे.

1 टिप्पणी: