1. ह्या व्यवसायामुळे स्त्री जातीचा व पर्यायाने संपूर्ण मानव जातीचीच अधोगती होत आहे.
२. हा व्यवसाय चालविण्यासाठी अब्रू घालवून आज अनेक मुली या नरकात येत आहेत.
३. अनेतिक व अयोग्य मार्गाने गरजा पूर्ण करता येत असल्याने विवाह संस्थेचे पावित्र्य व उदात्तता ह्यांनाच धोका उत्पन्न होतो.
४.बाहेरचा नाद लागल्याने अनेक सुखी कुटुंबे धुळीस मिळाली आहे.
५.समाजाच्या नीती मूल्यांना जबरदस्त हादरा बसला असून समाजात अशा तर्हेने स्वैराचार सुरु झाल्यास मानव जातीला आताच त्याचे भयंकर मोल देण्याची वेळ येऊन ठेपते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
६. वेश्या व्यवसायामुळेच व वासनाधीन आंबट शोकीनान्मुळेच अश्लील चित्रपटांची निर्मिती होत आहे. त्याचा परिणाम संपूर्ण समाजावर विशेषतः तरुण वर्गावर होऊन ते दिशाहीन होत आहे.
७. ह्या व्यवसायामुळे नेतिकतेचा ह्रास होत आहे.
८. एडस, गुप्त रोग आदि चा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होत आहे.
९. बालवेश्यांच्या प्रचंड मागणीमुळे मुलीना पळवून नेणे, फसवणे, आमिष दाखवून ह्या व्यवसायात आणण्याचे प्रकार वाढत असल्याने सामाजिक सुरक्षितता धोक्यात येत आहे.
१०.गुप्त रोग, एडस सारख्या रोगाचा फेलाव होऊन अनेक निरापराध व नवीन जन्मास येणार्या बालकांना सुधा ह्याचे भयंकर परिणाम भोगावे लागत आहे.
अशा तर्हेने ह्या व्यवसायाचे दुष्परिणाम लक्षात घेवूनही काही लोक या व्यवसायात उपयोगिता आहे असे म्हणतात. त्यांच्या मते, हा व्यवसाय समाजात असल्याने अनेक व्यक्तींची गरज भागवली जाते,तसे झाले नसते तर समाजातील सर्व साधारण स्त्रियांना या लोकांचा उपद्रव झाला असता.या मुद्द्यातील काही भाग एकवेळ मान्य करूनही या व्यवसायासाठी ज्या तर्हेने स्त्रिया मिळविल्या जातात ते मार्ग केव्हाही इष्ट नाही हे नजरेआड करून चालणार नाही असे वाटते.