जी हा हम वेशाये जरूर हे! लेकीन इस धंदे पे तो हमारी रोजीरोटी चलती हे! सरकार हमे सादा कंडोम बोक्स नही दे सकती ओर वो पुनर्वसन कि बात करते हे! क्या समाज हमे स्वीकार करेगा? क्या हमारी बहु बेटिया हमसे बात करेगी? क्या हमारे बच्चो के साथ आप के समाज के लोग शादी करेंगे? असे अनेक प्रश्न सफेद्लेन मधील देहविक्री करणार्या स्त्रिया करीत आहेत. त्यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्या जीवनाशी निगडीत व्यथा आणि आडचणी आगदी दिलखुलासपणे मांडल्या .
आम्हाला रोजीरोटी मिळवून देवू असे लोक सांगतात पण साधे निरोध देत नाहीत तर रोजीरोटी कुठून देणार? सरकारने रोजीरोटी जरी दिली तरी हे लोक आम्हाला त्यांच्यात सामावून घेतील का? असे अनेक प्रश्न त्यांना पडले आहेत.नाशिक शहरात भद्रकाली, विनय नगर, गंजमाळ असे सफेद लेन भाग आहेत. या परिसरात नेपाळी स्त्रिया मोठ्या प्रमाणात देहविक्री करताना आढळून येतात. गरिबीमुळे अनेक मुली या मार्गाला लागतात. असंख्य स्त्रियांना तसेच मुलीना त्यांचे भाऊ, वडील किंवा नवरेच विकतात. याच व्यवसायात केवळ स्त्री असल्याच्या बळावर जास्तीतजास्त पैसा कमवण्याची शक्यता असल्याने काहीना या व्यवसायाची भुरळ पडते.नवीन येणारी स्त्री सहजासहजी शरीर विक्रीला तयार नसते. अशावेळी कुंटणखाण्याची मालकीण व तिचे साथीदार धमक्या देवून,मारहाण करून बळजबरीने तिला धंदा करायला भाग पाडतात. अनेकदा तर गुंडांकरवी बलात्काराचा मार्ग अवलंबिला जातो. यानंतर येणारा प्रत्येक पुरुष तिचा हवा तसा उपभोग घेवून शोषण करतो. दिवसातून किती जणांना संमती द्यावी याचे तिला स्वातंत्र्य नसते. यातून प्राप्त होणारा फार थोडा भाग तिच्या हाती पडतो.
समाजाने नाकारलेल्या, समाजाकडून हिणवलेल्या,स्वप्नांचा चुराडा झालेल्या या देहविक्री करणार्या स्त्रियांची जबाबदारी नाशिक मधील एकही सामाजिक संस्था स्वीकारण्यास तयार नाहीये हि दुर्देवाची गोष्ट! त्यामुळे या स्त्रियांना गरजेचं कुकर्म करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा