भारत स्वतंत्र होवून ५४ वर्षे झालीत तरी देशातील अनेक तरुणींचे स्वप्न फुलासारखे कुस्करले जात आहे. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत आजही काही गरीब आणि निरक्षर स्त्रियांसमोर पोटाची खळगी भरण्यासाठी शरीरविक्रीचा धंदा करण्याशिवाय दुसरा रस्ता नसतो.उमलत्या वयात स्वप्नांच्या बलीवेदीवर वास्तवाशी चार हात करणार्या या स्त्रिया आता शहरातील मुख्यरस्त्यावर, प्रमुख बाजार पेठेतही फिरताना दिसू लागलेल्या आहेत. शहरातील सफेद लेन भागात हा व्यवसाय चालतो. या स्त्रिया आठ बाय दहाच्या लहान कोंडत खोल्यांमध्ये शरीरविक्रीचा व्यवसाय चालतो. जवळपास ४० खोल्यांमध्ये हा व्यवसाय सर्रास चालतो. प्रत्येक खोलीत एक पलंग,गाधी किवा सतरंजी वापरली जाते . बाजूला निरोध टाकण्यासाठी जागा पण असते.वापरलेले निरोध उघड्यावर पडलेले असल्यामुळे रोगराई पसरण्यास मदत होते. अशा या घाणेरड्या वातावरणात ह्या स्त्रियांची मुले वाढत असतात. साहजिकच या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर पण होतो. अनेक वेळेस परपुरुषांबरोबर आपल्या आईच्या संबंधाचे दर्शनही त्यांना उघड्या डोळ्यांनी पहावे लागते यातूनच त्यांची गुन्हेगारी वृत्ती बळावते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा