जगात फार प्राचीन काळापासून दुर्गुणांचा व्यापार म्हणून वेश्या व्यवसायाचा निर्देश करता येईल. भारतातही हा व्यवसाय फार प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे आढळते. भारतीय महाकाव्यात आणि पुराणिक कथेमध्ये अप्सरा ,मेनका, उर्वशी, रामभा अशा अप्सरा इंद्राच्या दरबारात देवाचे व इतर मान्यवरांचे संगीत-नृत्य गाऊन मनोरंजन करीत. आर्यान्माडे वेश्यांना अति महत्व असे. पांडव-कौरवांच्या राजवटीत हि वेश्यांना अतिशय महत्त्व होते. कोटील्ल्या अर्थाशास्त्राने वेश्याने कसे राहावे, कसे वर्तन करावे आदि विषयी नमूद केले आहे. त्यावेळी अतिशय सुशिषित वारांगणा ह्या समाजातील सुसंस्कृत व्यक्ती सोबत राहत. त्यांची सेवा हि केवळ आनंदासाठी नसून राजकारणातील डावपेच, हेराफेरीसाठी आदी कामासाठी ह्या वारांगणाचा वापरही केला जातो.
महाकवी कालिदासांच्या कारकिर्दीत ह्या वेश्यांना मेत्रीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्याचा संबंध ह्या मंदिराशी निगडीत होतो. ह्या वेश्या बहुतांशी तरुण होत्या तसेच त्यांचे आई-वडील देवाच्या सेवेसाठी व धर्माचा प्रसार होण्यासाठी त्यांना अर्पण करीत. अशा वेश्यांना भारतामध्ये वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. उत्तरमध्ये - मंगलमुखी, महाराष्ट्रात- मुरळी आदि नावाने संबोधले जाते. ह्या मुलींना समाजात आदराचे स्थान असून पूजा अर्चेच्या वेळी त्यांची उपस्थिती हि महत्वाची असते असे मानले जाते. मध्ययुगीन मुस्लीम राजवटीत हा व्यवसाय आश्रित स्वरूपाचा होता. राजातर्फे ह्या स्त्रियांना आश्रय दिला जात. एकंदर पूर्वी ह्या वेश्यांना एक विशिष्ट स्थान होते. त्यांच्या कला कोशल्याची कदर केली जात होती. हा अशा प्रकारचा वेश्या व्यवसायाचा इतिहास आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा